नगर जिल्‍हयातील नोकरी इच्‍छूक उमेदवारांनी आपली नावनोंदणी महास्‍वयं पोर्टलवर केलेली आहे. परंतू नावनोंदणी करतेवेळी आधार नंबर टाकलेला नाही किंवा ज्‍या उमेदवारांना आपली नोंदणीचे नुतनीकरण करण्‍यात आलेले नाही अशा सर्व उमदेवारांनी त्यांची महास्‍वयं पोर्टलवरील नोंदणी आधारशी लिंक करुन घ्यावी, उमेदवारांची नोंदणी आधार लिंक असेल तरच उमेदवारांची माहिती उद्योजकांना पाहण्‍यासाठी उपलब्‍ध होईल. नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्‍या बेरोजगार उमदेवारांना सर्व सेवासुविधा ऑनलाईन पध्‍दतीने वेबसाईटच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत, असे जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त वि. जा. मुकणे यांनी कळविले आहे.

उद्योजकांच्द्च्या मागणीनुसार उमेदवारांच्‍या याद्यांमध्‍ये समावेश होण्‍यासाठी नावनोंदणीस आधार लिंक असणे आवश्‍यक आहे. ज्‍या उमेदवारांनी नावनोंदणी आधारशी लिंक केलेली नाही त्‍यांनी विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर जाऊन आधार लिंक करुन आपली प्रोफाईल अपडेट करण्‍यात यावी, असे कळविण्यात आले आहे.   

महास्‍वयं वेबपोर्टलवर राज्‍यात वेळोवेळी आयोजित करण्‍यात येणा-या रोजगार मेळाव्‍याची माहिती, पसंतीक्रम नोंदविणे व रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्‍हणून सहभागी होणे. केंद्र व राज्‍य शासनामार्फत राबविण्‍यात येणा-या विविध कौशल्‍य विकास योजना व कौशल्‍य प्रशिक्षण देणा-या संस्‍था यांची माहिती प्राप्‍त करणे व सहभाग घेणे, वेगवेगळया उद्योजकांनी अधिसूचित केलेली रिक्‍त पदांची माहिती मिळते..