सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी 1 लाख कोटींचे कर्ज - गडकरी
💸 _सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी जागतिक बँकेने एक लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. हे कर्ज पूर्णपणे सुरक्षित असून त्यासाठी केंद्र सरकारने एक हजार 500 कोटी रुपयांचा विमाही उतरवला आहे. या माध्यमातून या उद्योगांना आता राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकाही कर्ज देऊ शकणार आहेत._
🧧 छोट्या उद्योगांना पॅकेजची गरज
महाराष्ट्रात जवळजवळ 15 लाख सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आहेत. त्यांची उलाढाल 2 लाख कोटी रुपयांची आहे. 1 कोटी लोकांना यातून थेट रोजगार मिळाला आहे.
🏦 सहकारी बँकांना कर्जाची संधी
गडकरी म्हणाले, या उद्योगांचे योगदान मोठे आहे. जागतिक बँकेकडून भारत सरकारने जे एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे, त्याची 75 टक्के हमी केंद्र सरकारचीच आहे. बँकांमार्फत त्याचे वितरण सुरू आहे. मात्र, अशा स्वरूपाची माहिती जेव्हा आपल्यासमोर आली तेव्हा आपण संबंधित जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून टार्गेट हे मिनिममसाठी असते. त्यावर तुम्हाला योग्यतेनुसार प्रस्ताव मंजूर करता येतात, असे सांगितले आहे.